Udayanraje Bhosale Bike Ride in satara : उदयनराजेंची साताऱ्यात सुस्साट बाईक रायडिंग | SakalMedia

2021-10-10 1,321

Udayanraje Bhosale Bike Ride in satara : उदयनराजेंची साताऱ्यात सुस्साट बाईक रायडिंग
सातारा - वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) आज पुन्हा एकदा बाईक राईडमुळे (Bike Ride) चर्चेत आले. कार्यकर्त्याची दुचाकी ताब्यात घेत त्यांनी राजपथासह शहराच्या विविध भागाची रपेट करत विकासकामांची उद्घाटने केली. उदयनराजे हे साताराच नव्हे, तर राज्यभरातील जनतेचा औत्सुक्याचा विषय असतो. राजकीय परिणामांची भीती न बाळगता त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे यापूर्वी राज्यात धुरळा उडवून दिला होता. मजबूत शरीरयष्टी, भेदक नजर, तडकाफडकी जागेवर निकाल लावण्याच्या त्यांच्या वृत्तीचा साताऱ्यात नेहमीच बोलबाला असतो. युवकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या उदयनराजे यांनी उगारलेले बोट, उडविलेली कॉलर, काय बाई सांगू कस ग सांगू.. हे म्हणलेले गाणे, त्यांची 007 क्रमांकाच्या जिप्सीचे नेहमी सर्वांना आकर्षण असते. चारचाकी इतकेच त्यांना दुचाकी वेगात चालविण्याची प्रचंड आवड आहे. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)
#UdayanrajeBhosale #Satara #BikeRide #UdayanrajeBhosaleStyle

Videos similaires